मराठी

देव तुम्हाला कधीही सोडून देत नाही

७ डिसेंबर २०२१
आगमनकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील मंगळवार 
आजची वाचने

संत अंब्रोस, बिशप आणि धर्माचार्य — स्मरणदिन

व्हिडिओ

“त्याचप्रमाणे, या लहानग्यांपैकी एकाचाही नाश व्हावा, अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.”  मत्तय 18:14

हरवलेल्या एका मेंढराचा दाखला सांगितल्यानंतर येशू हे उद्गार काढतो.  मेंढपाळ नव्याण्णव मेंढरे मागे सोडून त्या लहानग्या मेंढराचा कसोशीने शोध घेतो.  दाखल्यात पुढे असे म्हटले आहे: “ते त्याला सापडले तर, मी तुम्हाला खरे सांगतो, वाट न चुकलेल्या नव्याण्णव मेंढरांपेक्षा त्या एका मेंढरामुळे त्याला अधिक आनंद होतो” (मत्तय 18:13).

आपल्यापैकी प्रत्येक जण “या लहानग्यांपैकी एक” आहे.  नव्याण्णव मेंढरांपेक्षा त्या एका हरवलेल्या मेंढरामुळे मेंढपाळाला अधिक आनंद होतो, हे सुरुवातीला अन्यायकारक वाटू शकते.  पण आपल्यापैकी प्रत्येक जण ते एक हरवलेले मेंढरू आहे, हे लक्षात घेतले तर त्याचा आनंद का अधिक आहे, हे समजते.

या दाखल्यावर मनन करताना, आपल्याला शोधून काढण्याची मेंढपाळाला किती उत्कट इच्छा आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.  त्याला आपली किती काळजी आहे, तो न थकता किती प्रयत्न करतो आणि किती कसोशीने आपला शोध घेतो, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.  देवाला तुमची अशीच काळजी आहे.

ते एक हरवलेले मेंढरू तुम्हीच आहात, यावर आज मनन करा.  आपल्या पापांत “हरवून” जाण्याचा अनुभव सुखद नाही.  पापामुळे भीती, निराशा, गोंधळ, राग अशा भावना निर्माण होतात.  पण पापात अडकलो असतानाही आपण आपली नजर उत्तम मेंढपाळाकडे वळवली, तर आपल्याला पुन्हा आशा मिळेल.  आपल्या देवाला आपली इतकी काळजी आहे की तो आपला शोध घेणे कधीही थांबवणार नाही, ही आशा पुन्हा आपल्या मनात जागी होईल.  आणि आपण त्याला सापडू तेव्हा त्याचे हृदय परम आनंदाने भरून जाईल!

हे प्रभू, माझ्या पापी अवस्थेत आणि गोंधळात मी तुझ्याकडे वळतो.  तू मला शोधून काढशील, असा मला विश्वास आहे.  माझ्यावरच्या तुझ्या उत्कट प्रेमावर माझा नेहमी विश्वास राहो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

आगमनकाळासाठीचे आमचे सर्व साहित्य पाहा

मरियेच्या निष्कलंक गर्भधारणेची नोवेना
29 नोव्हेंबर–7 डिसेंबर

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आगमनकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – संत अंब्रोस, बिशप व धर्माचार्य

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील वैशिष्ट्यपूर्ण चित्र: उत्तम मेंढपाळ – बेर्हार्ड प्लॉकहॉर्स्ट यांचे चित्र, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने