मराठी

शुद्धीकरण

20 नोव्हेंबर 2020
सामान्य काळातील तेहतिसाव्या आठवड्याचा शुक्रवार
आजची वाचने

आगमनकाळासाठीचे आमचे साहित्य पाहा!

येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि तिथे वस्तू विकणाऱ्यांना हाकलून लावण्यास सुरुवात केली. तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, माझे घर प्रार्थनेचे घर असेल, पण तुम्ही त्याची चोरांची गुहा केली आहे.”  लूक 19:45-46

या उताऱ्यातून येशूने फार पूर्वी काय केले एवढेच नव्हे, तर आज तो काय करू इच्छितो हेही आपल्याला कळते.  हे काम तो दोन प्रकारे करू इच्छितो: आपल्या जगाच्या मंदिरातील सर्व वाईट गोष्टी त्याला मुळासकट काढून टाकायच्या आहेत आणि आपल्या अंतःकरणाच्या मंदिरातील सर्व वाईट गोष्टीही त्याला मुळासकट काढून टाकायच्या आहेत.

पहिल्या मुद्द्याबाबत हे स्पष्ट आहे की इतिहासात अनेकांची दुष्टता आणि महत्त्वाकांक्षा आपल्या चर्चमध्ये आणि जगात झिरपली आहे.  हे काही नवीन नाही.  चर्चमधल्याच लोकांकडून, समाजाकडून आणि अगदी स्वतःच्या कुटुंबाकडूनही प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काही दुखापत झाली असण्याची शक्यता आहे.  रोज आपल्या संपर्कात येणारे लोक परिपूर्ण असतील असे वचन येशू देत नाही; पण दुष्टाईविरुद्ध तो ठामपणे उभा राहील आणि ती मुळासकट काढून टाकील, असे वचन तो देतो.  

दुसरा आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा की, या उताऱ्यातून आपण आपल्या आत्म्यासाठी बोध घ्यावा.  प्रत्येक आत्मा हे एक मंदिर आहे; ते केवळ देवाच्या गौरवासाठी आणि त्याची पवित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी राखून ठेवले पाहिजे.  म्हणून, आपण आपल्या प्रभूला आपल्या आत्म्यात प्रवेश करू दिला आणि त्यातील दुष्टता व मलीनता पाहू दिली, तर आज हा उतारा आपल्या जीवनात पूर्णत्वाला येईल.  हे करणे सोपे नसेल आणि त्यासाठी खरी नम्रता व शरणागती लागेल; पण शेवटी आपला प्रभू आपल्याला स्वच्छ व शुद्ध करील.

येशू अनेक प्रकारे शुद्धीकरण घडवून आणू इच्छितो, यावर आज चिंतन करा.  संपूर्ण चर्च, प्रत्येक समाज व समुदाय, तुमचे स्वतःचे कुटुंब आणि विशेषतः तुमचा स्वतःचा आत्मा शुद्ध व्हावा, अशी त्याची इच्छा आहे.  येशूच्या पवित्र कोपाला त्याचे कार्य करू देण्यास घाबरू नका.  सर्व स्तरांवर शुद्धीकरण व्हावे म्हणून प्रार्थना करा आणि येशूला त्याचे कार्य पूर्ण करू द्या.

हे प्रभू, आपल्या जगाचे, आपल्या चर्चचे, आपल्या कुटुंबांचे आणि विशेषतः माझ्या स्वतःच्या आत्म्याचे शुद्धीकरण व्हावे, अशी मी प्रार्थना करतो.  आज माझ्याकडे ये आणि माझ्यातील कोणती गोष्ट तुला सर्वांत जास्त दुःख देते, हे मला दाखव.  माझ्या अंतःकरणात तुला अप्रिय असलेले सर्व काही मुळासकट काढून टाक.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

आगमनकाळासाठीचे आमचे साहित्य पाहा!

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील चित्र: ख्रिस्त नाणे बदलणाऱ्यांना मंदिरातून हाकलून लावतो — थिओदोर रॉम्बाउट्स यांचे चित्र