मराठी

दैवी वैद्याला आजारी लोकांची ‘गरज’ आहे

29 फेब्रुवारी 2020
राखेच्या बुधवारानंतरचा शनिवार
आजची वाचने

“निरोगी लोकांना वैद्याची गरज नसते, पण आजारी लोकांना असते.  मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”  लूक 5:31–32

रुग्ण नसतील तर डॉक्टर काय करणार?  कोणीच आजारी पडले नाही तर?  बिचाऱ्या डॉक्टरचा दवाखाना बंद पडेल.  म्हणून एका अर्थाने असे म्हणणे योग्य ठरेल की आपले काम करण्यासाठी डॉक्टरला आजारी लोकांची गरज असते.

येशूच्या बाबतीतही असेच म्हणता येईल.  तो जगाचा तारणारा आहे.  पण पापी कोणीच नसते तर?  अशा वेळी येशूचा मृत्यू व्यर्थ ठरला असता आणि त्याच्या दयेची गरजच पडली नसती.  म्हणून एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की जगाचा तारणारा म्हणून येशूला पापी लोकांची गरज आहे.  ज्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली, देवाचा नियम मोडला, स्वतःच्या आणि इतरांच्या प्रतिष्ठेचा भंग केला आणि जे स्वार्थीपणे व पापी रीतीने वागले, अशा लोकांची त्याला गरज आहे.  येशूला पापी लोकांची गरज आहे.  का?  कारण येशू तारणारा आहे आणि तारणाऱ्याचे काम तारण करणे हेच आहे.  तारण करायचे तर तारणाऱ्याला अशा लोकांची गरज असते, ज्यांना तारणाची गरज आहे!  समजलं का?

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.  कारण हे समजले की आपल्याला एकाएकी जाणवते की आपण आपल्या पापांचा मळ घेऊन येशूकडे येतो, तेव्हा त्याच्या हृदयाला मोठा आनंद होतो.  त्याला आनंद होतो, कारण एकमेव तारणारा म्हणून दया दाखवून पित्याने त्याच्यावर सोपवलेले कार्य तो पूर्ण करू शकतो.  

येशूला त्याचे कार्य पूर्ण करू द्या!  त्याला तुमच्यावर दया करू द्या!  यासाठी तुम्हाला दयेची गरज आहे, हे कबूल करा.  आपल्या असहाय आणि पापमय अवस्थेत त्याच्याकडे या.  आपण दयेस पात्र नाही, तर केवळ अनंत दंडास पात्र आहोत, हे मान्य करा.  अशा प्रकारे येशूकडे आल्याने पित्याने त्याच्यावर सोपवलेले कार्य त्याला पूर्ण करता येते.  त्याचे दयेने ओतप्रोत भरलेले हृदय त्याला प्रत्यक्ष कृतीतून प्रकट करता येते.  आपले कार्य पूर्ण करण्यासाठी येशूला तुमची ‘गरज’ आहे.  त्याला ही भेट द्या आणि त्याला तुमचा दयाळू तारणारा होऊ द्या.

आज देवाच्या दयेवर एका नव्या दृष्टीने चिंतन करा.  लोकांना बरे करण्याचे आपले कार्य पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या दैवी वैद्याच्या, म्हणजेच येशूच्या, दृष्टीने त्या दयेकडे पाहा.  आपले कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला तुमची गरज आहे, हे जाणून घ्या.  तुम्ही आपले पाप कबूल करावे आणि त्याच्याकडून बरे होण्यास तयार असावे, अशी त्याची अपेक्षा आहे.  असे करून तुम्ही आपल्या या काळात दयेचे दरवाजे उघडता आणि दया विपुल प्रमाणात वाहू देता. 

हे प्रिय तारणाऱ्या आणि दैवी वैद्या, आमचे तारण करण्यासाठी आणि आम्हाला बरे करण्यासाठी तू आलास, याबद्दल मी तुझे आभार मानतो.  माझ्या जीवनात तुझी दया प्रकट करण्याची तुला जी उत्कट इच्छा आहे, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो.  कृपया मला नम्र कर, जेणेकरून बरे करणारा तुझा स्पर्श मी स्वीकारू शकेन आणि तारणाच्या या देणगीतून तुला तुझी दैवी दया प्रकट करू देईन.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

तिसरे चिंतन – देवमातेचे विचार

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय


प्रायश्चित्तकाळासाठी तीन उत्तम पुस्तके
ऑनलाइन मोफत वाचा.  ई-पुस्तक & मऊ मुखपृष्ठाच्या छापील आवृत्तीतही उपलब्ध.

प्रायश्चित्तकाळ आणि पुनरुत्थानकाळातील चिंतन
कॅथलिक दैनिक चिंतनमाला

क्रुसाच्या पायथ्याशी ४० दिवस
आपल्या धन्य मातेच्या हृदयातून उमटलेली प्रेमळ दृष्टी

दैवी दयेवरील दैनिक चिंतन
संत फौस्तिनासोबत ३६५ दिवस