२६ मे २०२०
पास्काच्या सातव्या आठवड्यातील मंगळवार
आजची वाचने
संत फिलिप नेरी, याजक — स्मृतिदिन

येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, “पित्या, घटका आली आहे. तुझ्या पुत्राचा गौरव कर, म्हणजे तुझा पुत्र तुझा गौरव करील.” योहान 17:1
पुत्राचा गौरव करणे हे पित्याचे कार्य आहे; पण आपण सर्वांनीही या कार्याकडे लक्ष दिले पाहिजे!
सर्वप्रथम, येशू ज्या “घटके”विषयी बोलतो, ती त्याला क्रूसावर खिळण्याची घटका आहे, हे आपण ओळखले पाहिजे. प्रथमदर्शनी ती दुःखाची घटका वाटू शकते. पण दैवी दृष्टीने पाहता, येशूसाठी ती त्याच्या गौरवाची घटका आहे. त्या घटकेला स्वर्गीय पिता त्याचा गौरव करतो, कारण त्याने पित्याची इच्छा पूर्णपणे पार पाडली. जगाच्या तारणासाठी त्याने आपला मृत्यू पूर्ण मनाने स्वीकारला.
आपण याकडे आपल्या मानवी दृष्टीनेही पाहिले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात ही “घटका” आपण सतत स्वीकारू शकतो आणि तिला फलद्रूप करू शकतो, हे ध्यानात घेतले पाहिजे. येशूची ही “घटका” आपण आपल्या जीवनात सतत जगली पाहिजे. कशी? आपल्या जीवनातील क्रूस सतत स्वीकारून, जेणेकरून तो क्रूसही गौरवाची घटका ठरेल. असे केल्याने आपल्या क्रूसांकडे पाहण्यास आपल्याला दैवी दृष्टी मिळते आणि त्या क्रूसांना दैवी स्वरूप प्राप्त होते, त्यामुळे ते देवाच्या कृपेचे झरे बनतात.
शुभवर्तमानाचे सौंदर्य यात आहे की आपण सोसत असलेले प्रत्येक दुःख आणि आपण वाहत असलेला प्रत्येक क्रूस ही ख्रिस्ताचा क्रूस आपल्या जीवनातून प्रकट करण्याची संधी आहे. त्याचे दुःख आणि मरण आपल्या जीवनात जगून आपण त्याचा सतत गौरव करावा, असे तो आपल्याला आवाहन करतो.
आज तुम्ही सोसत असलेल्या हालअपेष्टांवर चिंतन करा. हे लक्षात ठेवा की तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या जीवनात कार्य करू दिले, तर त्याच्यामध्ये त्या हालअपेष्टाही त्याच्या तारणदायी प्रेमात सहभागी होऊ शकतात.
हे येशू, माझा क्रूस आणि माझ्या हालअपेष्टा मी तुला समर्पित करतो. तू देव आहेस आणि सर्व गोष्टींचे रूपांतर गौरवात करू शकतोस. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पवित्र आत्म्याची नोव्हेना
पेन्टेकॉस्टच्या तयारीसाठी केली जाणारी प्रार्थना
पाचवा दिवस — मंगळवार, २६ मे
आजचे संत – संत फिलिप नेरी, याजक




